‘टाटा’ करतेय कोविड योद्यांची वाहन’सेवा’

मुंबई :
लॉकडाऊनदरम्‍यान, २३ मार्च ते १० जूनदरम्‍यान टाटा मोटर्सने कोरोना विषाणू महामारीविराधोत लढणारे आवश्‍यक सेवा प्रदाते आणि प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत असलेल्‍या कर्मचा-यांच्‍या २२५ वाहनांची पाहणी केली. या ग्राहकांनी टाटा मोटर्स विशेष सेवा हॉटलाइन क्रमांक १८००२०९५५५४ वर संपर्क साधला होता. 
लॉकडाऊनदरम्‍यान मेन्‍टेनन्‍स व दुरूस्‍ती सेवांच्‍या सुलभ कार्यसंचालन खात्रीसाठी आणि आवश्‍यक सेवा प्रदाते, पोलिसांसारखे प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करत असलेले कोविड कर्मचारी आणि आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांच्‍या सेवा गरजांची पूर्तता करण्‍यासाठी टाटा मोटर्सच्‍या प्रादेशिक सेवा सहाय्यता टीमने दुरूस्‍तीची गरज असलेल्‍या वाहनांसाठी मेन्‍टेनन्‍स व सेवा देण्‍याच्‍या उद्देशाने विविध शहरांमध्‍ये कार्यसंचालन सुरू ठेवण्‍याची विशेष परवानगी मागितली.
ग्राहकांच्‍या त्‍यांच्‍या वाहनांच्‍या सॅनिटायझेशनसाठी विनंत्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी टाटा मोटर्सने विशेष उपक्रम नो टच बाय हँड सादर केला आहे. या उपक्रमांतर्गत वर्कशॉप्‍सने स्टिअरिंग व्हील, ड्रायव्‍हर्स सीट व गिअर नॉब्‍ससाठी बायो-डिग्रेडेबल डिस्‍पोजेबल कव्‍हर्स सादर केली आहेत. कार सर्विसिंगसाठी वर्कशॉपमध्‍ये आल्‍यानंतर हे कव्‍हर्स कारच्‍या आतील भागांमध्‍ये बसवले जातात आणि डिलिव्‍हरीच्‍या वेळी ग्राहकांसमोर काढले जातात. कॉन्‍टॅक्‍टलेस सर्विसची विनंती केलेल्‍या ग्राहकांसाठी कंपनीचे वर्कशॉप्‍स वेईकल पिकअप व ड्रॉप सुविधेची व्‍यवस्‍था करत आहेत आणि त्‍यांच्‍या ग्राहक सेवा अॅप व एसएमएसच्‍या माध्‍यमातून या सुविधेच्‍या स्थितीची माहिती सांगत आहेत. शारीरिक संपर्क टाळण्‍यासाठी पेमेण्‍ट्स ऑनलाइन स्‍वीकारले जात आहेत.

‘जीडब्लूएम’ आणणार महाराष्ट्रात प्लांट

१० जून २०२० पर्यंत ८०० हून अधिक सेल्‍स टचपॉइण्‍ट्स आणि ६५३ वर्कशॉप्‍सपैकी ५२० वर्कशॉप्‍सनी प्रवासी वाहनांसाठी स्‍टॅण्‍डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स (एसओपी)च्‍या नवीन नियमावलीसह कार्यसंचालने सुरू केली आहेत. तसेच या कार्यसंचालनांदरम्‍यान किमान परस्‍परसंवाद आणि अनिवार्य सोशल डिस्‍टन्सिंग नियमांचे पालन केले जात आहे, ज्‍यामुळे ग्राहकांसोबत होणारा व्‍यवहार सुरक्षित असल्‍याची खात्री मिळते.
अनेक केसेसच्‍या बाबतीत ग्राहकांना कार डिलिव्‍हरी त्‍याच दिवशी दिली जात आहे. पण वाहन दिवसा उशिरापर्यंत वर्कशॉपमध्‍ये आल्‍यास, रात्रभर वर्कशॉपमध्‍ये ठेवले जाते. बॅटरी चार्जिंगची आवश्‍यकता असलेल्‍या वाहनांना देखील हा नियम लागू होतो. तसेच अपघातामुळे गंभीर नुकसान झालेली वाहने ३ ते ४ दिवसांमध्‍ये दुरूस्‍त करून दिली जातात. याव्‍यतिरिक्‍त लॉकडाऊनमुळे टाटा मोटर्स सातत्‍याने अपॉइण्‍टमेंट्ससंदर्भात ग्राहकांच्‍या संपर्कात आहेज्‍यामुळे वर्कशॉप्‍स त्‍याअनुषंगाने स्‍पेअर पार्टस् व मनुष्‍यबळाची व्‍यवस्‍था करू शकतील.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here