पाकिस्तान शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला

कराची:
शहरातील पाकिस्तान स्टॉक एक्‍स्चेंजच्या इमारतीवर आज चार सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी केलेला गोळीबारात सहा जण ठार झाले असून सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत हे चारही हल्लेखोर ठार झाले आहेत. हे चौघे हल्लेखोर एका कारमधून आले होते. त्यांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावरच हातबॉम्ब फेकले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात चार सुरक्षा जवान ठार झाले. तेथे उपस्थित असलेला एक पोलीस अधिकारीही यात ठार झाला. स्टॉक एक्‍स्चेंजची ही इमारत चंदीग्रर मार्गावर आहे.
पाकिस्तानचा वॉल स्ट्रीट म्हणूनही हा परिसर ओळखला जातो. तेथे सकाळी हा अचानक हल्ला झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये मोठीच पळापळ झाली आणि त्यांच्यात मोठीच घबराट उडाली. तथापि, या हल्लेखोरांना आत घुसण्यास बराच प्रतिकार सहन करावा लागल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होण्याचे वाचले. या गोळीबारात एक नागरिक ठार झाला आहे. चार हल्लेखोर, चार सुरक्षा जवान, एक पोलीस अधिकारी आणि एक नागरिक असे एकूण दहा जण ठार झाले. चारही हल्लेखोर मुख्य इमारतीच्या बाहेरच मारले गेल्याने त्यांचा हा हल्ला विफल ठरला आहे.

‘असे’ असूनही भारतीय बाजार अस्थिर

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या माजीद बिग्रेड गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या वर्षी ग्वादर येथील पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात याच गटाचा हात होता. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांकडे आधुनिक स्वयंचलित हत्यारे होती व त्यांनी या स्टॉक एक्‍स्चेंजमध्ये घुसून तेथील नागरिकांना ओलिस ठेवायचे होते.
ते ज्या मोटारीतून आले होते ती गाडी गेटवरच अडवण्यात आली. त्यामुळे त्यांनी तेथे सुरक्षा रक्षकावर हल्ला सुरू केला. पण त्या रणधुमाळीत दोन अतिरेकी आत घुसण्यात यशस्वी झाले पण त्यांना इमारतीच्या कम्पाऊंडमध्येच टिपण्यात आल्याने ते प्रत्यक्ष इमारतीत घुसण्यास असमर्थ ठरले अन्यथा तेथे मोठाच घातपात झाला असता. कोणताही हल्लेखोर मुख्य इमारतीत घुसू शकला नाही. पाकिस्तानातील करोना स्थितीचा गैरफायदा घेऊन मोठा घातपात घडवण्याचा हल्लेखोरांचा डाव होता, असा आरोप सिंध प्रांताचे गव्हर्नर इम्रान इस्माईल यांनी म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here