‘एडइंडिया’ने केले मनपा शिक्षकांना ‘डिजिटल’

मुंबई :
ठाणे महानगरपालिकेने जिल्ह्यातील ८५० शाळांमधील सुमारे ८००० शिक्षकांना डिजिटली कुशल करण्यासाठी एडइंडिया बरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत ठाणे महानगरपालिका आणि एडइंडिया यांनी दिनांक १७ आणि १८ जून रोजी ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण शिबीर राबविले ज्यामध्ये ८००० शिक्षकांना कोविड-१९ काळामध्ये नवीन तंत्रज्ञान-प्रेरित शिक्षण मॉडेलशी जुळवून घेण्यासाठी मदत केली.
कोविड-१९ या महामारीचा प्रसार थांबविण्यासाठी त्वरित तोडगा अजूनही दृष्टिपथ्यात नसल्याने शाळा पुन्हा केव्हा सुरू होतील याबद्दल अनिश्चितता आहे. यामुळे भारतातील 250 दशलक्ष मुलांच्या फक्त शिकण्याच्या निरंतरतेत अडथळा येत नाही तर त्यांची मानसिकता आणि मानसिक स्वास्थ्यही धोक्यात आले आहे. शिक्षकांमध्ये मानसिक आरोग्य आणि बालरक्षण यांविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी टीएमसीने या 2-दिवसीय ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तज्ञांना आमंत्रित केले होते. यूट्यूब आणि प्रज्ञान अ‍ॅपवर थेट प्रक्षेपित केले जाणारे ऑनलाइन प्रशिक्षण शिक्षकांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची साधने आणि त्यांच्या ऑनलाइन शालेय शिक्षण शिकण्याच्या निरंतरतेसाठी व्यासपीठ अवलंबण्यासही तयार करेल.
सिया कोठारी ‘गोप्रेप टॅलेंट सर्च’ची मानकरी 

शिक्षकांना पाठिंब्याची आवश्यकता आहे हे मान्य करून ठाणे महानगरपालिका उपायुक्त मनीष जोशी म्हणाले की, “साथीच्या रोगाने आम्हाला तांत्रिक, अध्यापनशास्त्रीय आणि निर्देशात्मक आव्हाने असलेले दूरस्थ शिक्षण अवलंबिण्यास भाग पाडले. मला आनंद आहे की, आम्ही एडइंडियाबरोबर भागीदारी करू शकलो. त्यांच्या कौशल्यामुळे आम्ही आता तंत्रज्ञानावर शिक्षकांची क्षमता आणि उत्कृष्ट वर्ग वितरण पोहोचवू शकतो. हा संपूर्ण कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकल यांच्या विचारातून साकारला आहे ज्यांचे असे मत आहे की वर्ग आयोजित करणे, विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे आणि प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविणे चालू ठेवणे यासाठी ऑनलाईन शैक्षणिक व साधनांवरील पुनर्रचना आवश्यक आहे.”
या कार्यात मदत करण्याची संधी मिळाली याविषयी बोलताना एडइंडिया फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाक्षी अग्रवाल यांनी सांगितले कि, “साथीच्या रोगामुळे आपण एका भितीदायक परिस्थितीत आहोत आणि आपल्या सर्व मुलांचे शिक्षण, संरक्षण आणि कल्याण यासाठी आपण सर्व हितधारकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. या प्रशिक्षणाद्वारे तंत्रज्ञान आत्मसात करणे, मुलांचे कल्याण करणे आणि कोविड-१९ नंतरची आव्हाने आणि नवकल्पना तयार करणे यासाठी शिक्षक सक्षम होतील.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here