…म्हणून  वधारला सोन्याचा भाव

golds

मुंबई :
महामारीनंतरच्या काळात अर्थव्यवस्था सुधारण्यास मोठा काळ लागू शकतो, यामुळे यलो मेटलच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे स्पॉट गोल्डचे दर ०.८२ टक्के वाढून ते १७२९ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन अॅग्री कमोडिटीज व करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यास अपयशी ठरत असल्याने तीव्र असमाधान व्यक्त केले. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी आक्रमक प्रोत्साहनपार आर्थिक पॅकेजची घोषणा केल्याने तसेच कमी व्याजदर ठेवल्याने सोन्याच्या किंमतीला आधार मिळाला.

‘जनरल अटलांटिक’ची ‘जिओ’मध्ये गुंतवणूक 
gold gold
स्पॉट सिल्व्हर किंमती १.४७ टक्क्यांनी वाढून १५.९ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सच्या किंमती २.७ टक्क्यांनी वाढून ४४,१३५ रुपये प्रति किलोनी वाढल्या.
एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने घोषणा केली की, यू एस क्रूड इन्व्हेंट्री लेव्हल पुढील महिन्यात घटणार आहे. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढून ८.९ टक्के म्हणजेच २७.६ डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर बंद झाल्या.
मागणीतील कपातीवर मात करण्यासाठी सौदी अरबसह ओपेकच्या बहुतांश सदस्यांनी आक्रमक आणि समजदारीने उत्पादन कपातीली घोषणा केली. तसेच काही औद्योगिक कामकाज पुन्हा सुरु झाल्याने तेलाच्या किंमती वाढण्यास आधार मिळाला. जगभरातील रस्ते आणि हवाई वाहतुकीवर निर्बंध असल्याने तेलाच्या किंमती आणखी वाढण्यास फार वाव नाही.

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा… 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here