मुंबई :
प्रभा खैतान फाऊंडेशनने आपल्या किताब या व्यासपीठाच्या माध्यमातून ‘दि कोरोना व्हायरस: व्हॉट यु वॉन्ट टू नो अबाऊट दि ग्लोबल पॅनडेमिक’ या ई-पुस्तकाचे व्हर्च्युअल प्रकाशन केले. हे पुस्तक डीआयवायहेल्थचे सहसंस्थापक डॉ. स्वप्नील पारीख, क्लीनिकल मनोवैज्ञानिक और मेडिकल शोधकर्ता आणि मेडिकल रिसर्च माहेरा देसाई आणि जसलोक हॉस्पिटलचे मेडिकल रिसर्च अँड न्यूरोसाइकाइट्री डॉ. राजेश पारीख यांनी लिहिले आहे. पेंग्विनद्वारा प्रकाशित या पुस्तकात या जीवघेण्या व्हायरसपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याविषयी काही महत्वपूर्ण सल्ले देत या महामारीच्या इतिहासाची माहिती दिली आहे.
आता रोबोट करणार पाठीचा मसाज
या पुस्तकात आपल्याला इतिहासातील वेगवेगळ्या कालावधीमध्ये जगाच्या महामारीच्या विरोधातील संघर्ष आणि आपल्या समोर आता येणाऱ्या आव्हानांचे एक चित्र उभे करते. या ऑनलाईन प्रकाशनाबद्दल फाऊंडेशनच्या संपर्क आणि ब्रॅंडिंग प्रमुख मनीषा जैन म्हणाल्या कि, या इंटरॅक्टिव्ह चर्चासत्रातून तज्ञ लोकांकडून विश्वसनीयआणि विस्तृत माहिती मिळाली, ज्यामुळे आम्हाला हा घातक व्हायरस समजून घेण्यास मदत मिळाली आणि सर्वांना हे सुद्धा सांगण्यात आले कि मानवजातीच्या भविष्यासाठीयाच्या विरोधात कशा प्रकारे तयारी करावी लागेल आणि आपण स्वतःला सुरक्षित कसे ठेऊ शकू.”
यापुस्तकाचे सह-लेखक डॉ. स्वप्निल पारिख म्हणाले कि, आम्ही फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे पुस्तक लिहिण्यास प्रारंभ केला होता. जेव्हा हि समस्या चिनी समस्या मानली जात होती आणि वुहान आणि हूबेई प्रांतापर्यंतच सीमित होती. हे पहले पुस्तक आहे जे या महामारीसंबंधित इतिहास, विकास, सत्य आणि मिथ्याविषयी माहिती देते. आज विश्वाकडे पर्याप्त तंत्रज्ञान आणि ई-बोला, स्वाइन फ्लू, जीका यांसारख्या महामारीचा अनुभव आहे, तरीही मागील अनुभवातून शिकण्याची आपली अक्षमता आणि अनिच्छा यांमुळे या स्थितीचे नियंत्रण नकरायला उशीर झाला.’
ताज्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा