‘पुढील पाच महिने मिळणार मोफत धान्य’

नवी दिल्ली:
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात उदभवलेली गंभीर परिस्थिती आणि लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावाबाबत मोदी बोलतील, असा  अंदाज होता. मात्र, मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या संकटावर भाष्य केलं. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याची घोषणा मोदींनी केली. त्यानुसार, देशातील 80 कोटी नागरिकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणी एक किलो चना डाळ आणखी 5 महिने मोफत मिळणार आहे.
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडक नियम पाळण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत स्थानिक प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे आजही महत्त्वाचं असल्याचं मोदींनी आजच्या भाषणात म्हटलं.

 ‘टिकटॉक’सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देणारी ही योजना नोव्हेंबरमध्येही सुरू राहील, असे मोदींनी स्पष्ट केले. सरकारद्वारा या पाच महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक बंधु-भगिनींंना ५ किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ प्रत्येक व्यक्तीसाठी मोफत देण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक कुटुंबाला 1 किलो हरभरा डाळही मोफत मिळेल. या योजनेच्या विस्तारात ९० हजार कोटीहून अधिक खर्च झाला असून गेल्या तीन महिन्यांचा खर्चही जोडला तर दीड लाख कोटी रुपये खर्च होतात, असेही मोदींनी सांगितले.
आम्ही संपूर्ण भारतासाठी स्वप्न पाहिलं आहे, एक राष्ट्र, एक रेशनकार्ड योजना सुरु करण्यात येत आहे. याचा सगळ्यात मोठा लाभ त्या गरीबांना मिळेल जे रोजगार किंवा अन्य गरजांसाठी गाव सोडून अन्यत्र जातात, अन्य राज्यात जातात. सरकार आज गरिबांना, गरजूंना मोफत  धान्य देऊ शकतेय, तर त्याचं श्रेय मुख्यत्वे दोन वर्गांना जात असून मेहनती शेतकरी आणि प्रामाणिक करदाते असे मोदी म्हणाले. आपले परिश्रम, समर्पण या जोरावरच देश ही मदत करू शकतोय. आज देशाचं अन्न भांडार भरलंय म्हणूनच गरीबांच्या घराची चूल पेटतेय, असेही मोदींनी म्हटले.  केंद्र सरकारकडून लॉकडाऊन काळात 30 कोटी जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असून 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले असल्याचे सांगण्यात आले. 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here