पॅकेजचा बाजारावर काहीच परिणाम नाही

मुंबई :
मागणीच्या बाबतीत चिंता कायम असल्याने सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहनपर पॅकेज शेअर बाजारावर परिणाम करण्यात अपयशी ठरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. परिणामी एस अँड पी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये २ टक्क्यांची घसरण झाली. दिवस पुढे जाऊ लागला, तशी घसरण वाढत गेली. ३० शेअर सेन्सेक्सचा निर्देशांक ८८५.७२ अंक किंवा २.७७% नी घसरला. तो ३१,१२२.८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५० चा निर्देशांक २४०.८० अंक किंवा २.५७% नी कमी झाला. तो ९,१४२.७५ अंकांवर बंद झाला.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.५६ रुपयांवर घसरला. यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापा-यांच्या भावनांवर परिणाम झाला. सेन्सेक्सचे ३० पैकी २३ शेअर्स आज रेड झोनमध्ये बंद झाले. सर्वात मोठा फटका आयटी, बँक्स, ऑटो आणि एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख शेअर्सना बसला.

बँकिंग क्षेत्रासाठी बॅकफायर:
निफ्टी बँक इंडेक्स मागील ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत ५६८.४५ अंक किंवा २.८८% च्या घसरणीसह १९०६८.५० अंकांवर बंद झाला. सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेने ३.९२% किंवा १.२० रुपयांची घसरण नोंदवली. तो २९.४० रुपयांवर बंद झाला. एचडीएफसी बँकेचा नफाही कोरोना व्हायरसवर केलेल्या अनपेक्षित तरतुदींमळेही कमकुवत पडला. अशा प्रकारे खासगी बँकांमध्ये सर्वोच्च भागीदारी असलेल्या खासगी क्षेत्राचा बँक शेअर बाजारात कमकुवत पडलेला दिसला. तो ८९३.८५ रुपयांवर बंद झाला. म्हणजेच ३३.८० रुपये किंवा ३.६४ टक्क्यांनी खाली आला.

आत्मनिर्भर भारत : ‘१८५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात’


टेक सेक्टरही रेड झोनमध्ये:
टेक महिंद्राच्या शेअरच्या किंमतीत ५.३२% किंवा २९.०० रुपयांची घसरण झाली. तो ५१५.७५ रुपयांवर बंद झाला. इन्फोसिस लिमिटेडदेखील लाल रंग दर्शवत बंद झाला. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये ५.१०% ची घसरण होती. आज ज्या शेअर्सनी चांगला व्यापार केला, त्यात केमिकल आणि फर्टिलायझर्स, हेल्थकेअर सेक्टर्सदेखील होते.

इन्फ्रा क्षेत्रातही मंदी कायम:
ज्यांनी डेली चार्टमध्ये चॅनल पॅटर्न ब्रेकआउट प्रदान केला, त्यात अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडचा समावेश आहे. आजच्या घसरत्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक स्थैर्य प्रदान करण्यात यशस्वी ठरला. ट्रेडिंग सेशनच्या सुरुवातीला ३,४९१.०० रुपयांसह खालील स्तर गाठला आणि नंतर ४३.३० रुपये किंवा १.२२% च्या वृद्धीसह ३,५९०.०० रुपयांवर बंद झाला. जेके सिमेंट आजच्या सर्वात मोठ्या घसरणीसह १,०७४ रुपयांवर बंद झाला. याने शेअरमध्ये ५.३०%ची घसरण दर्शवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here