सेन्सेक्सने गाठला ३१६८५.७५ अंकांचा टप्पा

nifty
830763926

मुंबई :
सुरुवातीच्या टप्प्यात विक्रीचा तणाव अनुभवल्यानंतर बुधवारी शेअर बाजार सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टी ६५.३० अंक म्हणजेच ०.७१%ची वाढ घेत ९२७०.९० अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्स २३२.२४ अंक अर्थात ०.७४ % वाढून ३१,६८५.७५ अंकांवर बंद झाला. निफ्टी सुरुवातीला ९३०० अंकांवर घसरला होता. एफएमसीजी, तेल आणि वायू क्षेत्रातही विक्रीचा तणाव अनुभवण्यात आला. बँकिंग, फार्मा, ऑटो, इन्फ्रा यासारख्या क्षेत्रानेही आजच्या संपूर्ण दिवसात खरेदीदारांना रस असल्याचे दिसून आले. १०७४ शेअर्सने सकारात्मक गती अनुभवली. तर १२२३ शेअर्सनी रेड झोन दर्शवला. उर्वरीत १४१ शेअर्सनी जैसे थे स्थिती दर्शवली. एकूणच आजचा शेअर बाजार हा खरेदीदारांसाठी अनुकूल असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी व्यक्त केले.

share market
सोने आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत सुधारणा

आजच्या सेशनमध्ये टॉप गेनर्समध्ये बजाज फायनान्सचा समावेश होता. हा शेअर २०१० रुपयांनी सुरु होऊन २१६० रुपयांवर बंद झाला. इतर लाभधारकांमध्ये एमअँडएम असून तो ५.१६ टक्क्यांची वृद्धी घेत ३८८ रुपयांवर बंद झाला. गेलचे शेअर्स ३.९५ टक्क्यांनी वाढून ९४.७१ रुपयांवर बंद झाला. एचडीएफसी बँकेनेही ३.८३ टक्क्यांची वृद्धी घेत ९४६.५५ रुपयांवर विश्रांती घेतली. भारती एअरटेलने ३.४०% ची वृद्धी घेत ५४६ रुपयांवर विश्रांती घेतली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप इंडायसेसमध्ये सकारात्मक गती दिसून आली. यात ०.५ ते ०.८ टक्क्यांची वृद्धी दिसून आली.

एफएमसीजी आणि आयटीसारखे क्षेत्र आज नकारात्मक स्थितीत दिसून आले. सर्व निर्देशांकांनी आज अस्थिरता दर्शवली व गुंतवणूकदारांनी पैसा कमावला. या सेशनमधील लूझर्समध्ये आयटीसी –५.७६%, कोल इंडिया -३.०८%, आयओसी -२.७३% आणि यूपीएल -२.०८% यांचा समावेश होता. सरकारने आयटीसीतील ७.९ टक्के भाग विकून २२ हजार कोटी रुपये कमावण्याची घोषणा केल्यानंतर एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख असलेल्या आयटीसीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला. सरकारने घोषणा केल्यानंतर आयटीसीने आजच्या संपूर्ण दिवसात विक्रीचा दबाव सहन केला.
अर्थ जगतातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे युट्यूब चॅनेल 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here