‘पाहिजे रासायनिक अस्त्रांना निर्बंध घालणारी यंत्रणा’

पुणे :
मानव सुरक्षेचा विकास होण्यासाठी सर्व राष्ट्रांनी शांततापूर्ण पध्दतीने काम करण्याच्या दृष्टीने जागतिक स्तरावर आवाज उठवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. सर्व देशांना एका उद्देशासाठी एकत्रित करुन जैविक/रासायनिक अस्त्रांचे निर्मूलन करणारी यंत्रणा विकसीत करण्याचा तसेच संशोधनावर मर्यादा आणण्यासाठी व जैव-रासायनिक हिताच्या विकासासाठी कायदेशीर व्यवस्था करण्यात आली पाहिजे, असे प्रतिपादन एमएइइआरच्या एमआयटी ग्रुपचे उपाध्यक्ष राहुल कऱ्हाड यांनी केले. एमआयटी जागतिक शांतता विद्यापीठाच्यावतीने आयोजित ‘जैविक आणि रासायनिक शस्त्रांचे निर्मूलन’ या वर्च्युअल परिषदेचे उदघाटन करताना ते बोलत होते.
चार दिवसीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील नामवंत या जैविक युध्दाच्या विविध पैलूंची चर्चा करतील. त्याचप्रमाणे कायदेशीर रुपरेषा तयार करण्याच्या दृष्टीने एकत्रितपणे प्रयत्न करतील. या परिषदेत युनेस्कोचे चेअर होल्डर प्रा. डॉ. विश्वनाथ डी. कराड -एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष, डब्ल्यूपीसी, एमएइइआर एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, न्या. के.जी. बालकृष्णन – भारताचे माजी मुख्य न्यायाधीश, माजी अध्यक्ष, नॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन ऑफ इंडिया (एनएचआरसी), डॉ. राजेंद्र सिंह – सुप्रसिद्ध जलसंधारण तज्ञ (भारताचे वॉटरमॅन) आणि तरुण भारत संघाचे अध्यक्ष, जीव्हीव्ही सरमा, आयएएस, सदस्य सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सरकार भारत, डॉ. ए वेलुमणी – संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, थायरोकेयर टेक्नोलॉजीज लिमिटेड आणि माजी वैज्ञानिक, भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), न्यूक्लिअर हेल्थकेअर लि. (एनएचएल) चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, आरिफ मोहम्मद खान – केरळचे राज्यपाल, माजी कॅबिनेट मंत्री, ऊर्जा आणि नागरी उड्डयण, भारत सरकार, प्रा. डॉ. अतानू बसु – संचालक श्रेणीचे वैद्यानिक जी, आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य व एफडब्ल्यू मंत्रालय, भारत सरकार आणि सहायक प्राध्यापक, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मंडी. या परिषदेमध्ये जैविक/रासायनिक हिताच्या अनेक पैलूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध सत्रांचा समावेश असेल.
आशा कोविड-१९ लसीची…

या सोहळ्यामध्ये बोलताना डॉ. एन टी राव, वाइस चान्सलर, एमआयटी-डब्ल्यूपीयू म्हणाले, ”या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक सुजाण व्यक्ती युनायटेड नेशन्सना रासायनिक आणि जैविक शस्त्रांमुळे निर्माण झालेल्या या जोखमीचा समूळ नाश करण्याचे निवेदन करण्यासाठी एकत्रित झाल्या आहेत. एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये जागतिक शांततेवर विश्वास असलेले लोक एकत्रितपणे संवाद साधून निर्णय घेणार आहेत आणि जगाच्या हितासाठी ठराव संमत करणार आहेत.”या परिषदेमार्फत जगातील तरुणांना “सेफ अँड सेक्युअर मॅनकाइंड” या संदेशासोबत अशाप्रकारच्या निंदनीय जैविक जोखमींची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिषदेमध्ये भविष्यातील तयारीच्या समस्येचे निवारण करण्याच्या गरजेवर देखील लक्ष केंद्रित केले जाणार आहे ज्यामुळे आपण स्वत:ला अशा जागतिक संकटांपासून सुरक्षित ठेवू शकतो.

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here