‘या’ कंपनीने केले देशातील पहिले कोविड स्वॅब विकसित

मुंबई :
देशभर कोरोनाव्हायरस चाचणीसाठी गरज वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सुपार्श्व स्वॅब्स (ट्युलिप्स), या भारतातील पर्सनल हायजिन कन्झ्युमर उत्पादनांमध्ये नावीन्य आणण्यात आघाडीवर असणाऱ्या आणि ट्युलिप्स या झपाट्याने वाढत्या लोकप्रिय ब्रँडची मालकी असणाऱ्या कंपनीने कोविड-१९ चाचणीला चालना देण्याच्या हेतूने, सध्या प्रत्येक आठवड्याला केले जाणारे दोन दशलक्षहून अधिक कोविड-१९ स्वॅबचे उत्पादन मे २०२० अखेरीपर्यंत दर आठवड्याला पाच दशलक्षहून अधिक स्वॅबपर्यंत वाढवले जाणार आहे.
कोविड-१९ संघर्षामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या नेझल व थ्रोट स्वॅबच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करणे, तसेच पुरवठ्यासाठी अन्य देशांवरील अवलंबित्व कमी करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. आयात केलेल्या थ्रोट स्वॅबपेक्षा देशात निर्मिती केलेल्या स्वॅबची किंमत एक-दशांश कमी असल्याने, कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याने कंपनीने किफायतशीर स्वॅबची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
‘जॉय’ने आणले हर्बल सॅनिटायझर
covid swab
असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीचे (AiMeD) फोरम समन्वयक राजीव नाथ यांनी स्पष्ट केले. “देशातील लॉकडाउनचे निर्बंध कमी करायचे असतील व अर्थव्यवस्था पुन्हा सक्रिय करायची असेल तर कोविड-१९चा सामना करण्याच्या दृष्टीने भारतामध्ये चाचण्यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी दर आठवड्याला ७ –१० दशलक्षहून अधिक स्वॅबची गरज भासू शकते. काही बाबतीतील निर्बंध शिथिल केल्यावर या विषाणूचे संक्रमण वेगाने होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी अब्जाहून अधिक भारतीय लोकसंख्येची कोविड-१९ चाचणी करायचे नियोजन असेल तर स्वॅबची ही संख्या लक्षणीय आहे.”

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here