महिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात

– प्रभाकर तिवारी

चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात झालेले कोणतेही काम अखेरीस चांगल्या रितीने पूर्ण होते. घरात किंवा कामाच्या ठिकाणी दररोज असंख्य कामे पार पाडणाऱ्या महिलांसाठी ही उक्ती विशेषत: लागू पडू शकते. मल्टीटास्किंग कठीण असते, पण दिवसाची सुरुवात योग्यरित्या केल्यास यासोबत येणारा तणाव कमी होऊ शकतो. दिवस योग्य पद्धतीने सुरु करण्याच्या काही टिप्स.

झोपण्यापूर्वी परिपूर्ण दिवसाची कल्पना करा: प्रत्येक दिवसाची चांगली सुरुवात ही त्याआधीच्या रात्रीपासून सुरू होते. हे विचित्र वाटेल. पण याच प्रकारे विचार करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी परिपूर्ण दिवसाची कल्पना केल्यास, दुस-या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमच्या समोर खूप चांगल्या अपेक्षा असतील. यात कल्पनेपेक्षा अधिक चांगल्या गोष्टी घडू शकतील. आदर्श दिवसाची कल्पना करणे आणि आपल्या कामासाठी आधीच तिथे पोहोचणे, या कल्पनेने पुढे जे घडणार आहे, त्यासाठी आपण पूर्णपणे तयार होतो.

सकाळच्या वेळापत्रकात मनास प्रोत्साहन देणा-या सवयी समाविष्ट करा: सप्ताहाच्या अखेरीस किंवा सुटीच्या दिवशी निवांत सकाळ घालवली जाते. पण तुमचा पूर्ण दिवस व्यग्र असेल तर तुमच्या मेंदूला जागे करण्यासाठी काही मनाला उत्तेजन देणा-या सवयी लावून घेणे आवश्यक आहे. यात सकाळी वृत्तपत्र वाचणे, बिझनेस जर्नल चाळणे, बाजाराच्या बातम्या पाहणे इत्यादी. सकाळच्या सत्रात अशा सवयी लावून घेतल्यास तुम्ही संपूर्ण दिवसभर तुम्ही सजग आणि मानसिकरित्या चपळ व्हाल.

योग्य अल्पोपहार घ्या: ब्रेकफास्ट किंवा नाश्ता हा दिवसातील महत्त्वाचा भाग असतो, यात शंकाच नाही. यामुळे तुमच्या मेंदूला इंधन मिळते आणि संपूर्ण दिवस तुम्हाला बिझी ठेवते. मेंदूला कार्बोहायड्रेट्स लागतात, त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये कार्बोहायड्रेट्स समाविष्ट करायला विसरू नका. तुमचा दिवस कसाही असला तरी या टिप्स महत्त्वाच्या आहेत. मग तुम्ही एक गृहिणी या नात्याने तुम्ही दिवसभर असंख्य कामे करत असाल किंवा एक चतुर गुंतवणूक असाल, जिला बाजाराचा सतत मागोवा घ्यावा लागतो किंवा दिवसभर नोकरी करणारी प्रोफेशनल महिला असाल, दिवसाची सुरुवात कशी करता, ते महत्त्वाचे आहे.
women

दिवसाचे योग्य नियोजन करा: आपल्या दिवसाची सुरुवात आधईपासूनच करणे आणि यासाठीची संदर्भ-सूची तयार केल्यास गोष्टी अधिक सोप्या होऊ शकतात. यामुळे तुम्ही कोणती कामे पूर्ण केलेली आहेत, आणि कोणती बाकी आहेत, याचे स्पष्ट चित्र तुमच्यासमोर मिळते. मार्गदर्शक ठरणारा प्लॅन केलाच नाही तर तुम्ही एखादे महत्त्वाचे काम विसरू शकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे तुमची दिवसभरातील कामे लिहून (टाइप करा) काढा आणि ती कोणत्या क्रमाने करणारा आहात, हेदेखील लिहा. यामुळे अनेक गोष्टी अधिक सोप्या होतील.

मनाने सावध राहण्याचा प्रयत्न करा: सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, मानसिकदृष्ट्या सजग राहिल्यास हातातील कामावर लक्ष केंद्रित करता येते. यामुळे तुमची कामे अधिक प्रभावीपणे होतील. हे फक्त तुमच्या व्यावासयिक आयुष्यासाठी उपयुक्त नाही तर वैयक्तिक जीवनासाठीही महत्त्वाचे आहे. सजग किंवा सावध राहिल्याने वेळेचा मागोवा घेणे सोपे जाते. त्यामुळे तुम्ही पौष्टिक अन्न सेवन कराल आणि एवढंच काय तर तुम्हाला पैसे वाचवणेही सोपे जाईल. त्यामुळे सावध राहून दिवसाची सुरुवात करा आणि पहा, तुमचाण तणाव दूर होऊ लागेल.

(लेखक एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here