सीवूड ग्रँड सेंट्रलमध्ये ‘टॉय ऑफ हॅप्पीनेस’

seawoods

नवी मुंबई :
यंदाच्या वर्षी सांताक्लॉज भरपूर आनंद आणि भेटवस्तू घेऊन जरा लवकरच येत आहे कारण नवी मुंबईतील आवडते शॉपिंग आणि फॅमिली डेस्टिनेशन असलेला सीवूड (seawood) ग्रँड सेंट्रल मॉल ‘टॉय ऑफ हॅप्पीनेस’ हि सर्वात मोठी ख्रिसमस ऑफरिंग साजरे करण्यास सज्ज झाला आहे. ख्रिसमसची गंमतजंमत आणि भुरळ घालणारी आनंद सफर घडवत बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद फुलवण्यासाठी सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलची जय्यत तयारी झाली आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाचा उत्सव एका वेगळ्या उंचीवर नेत या मॉलमध्ये शहरातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री उभारण्यात येणार आहे. हे येथील एक मुख्य आकर्षण असेल आणि येथे फोटो काढण्याची/ही संधी मिळेल. या माध्यमातून स्वागत करण्यात येईल, उत्साह वाढविला जाईल आणि सर्व खेळणी व शॉप अँड विन भेटवस्तू दाखविण्यात येतील.
पारंपरिक ख्रिसमसचे वातावरण आणि ख्रिसमस टॉय ट्री सजावटीसोबतच मॉलमध्ये ख्रिसमसच्या संकल्पनेवर आधारीत हँगिंग्स, दर्शनी भागातील प्रकाशयोजना, स्नोफ्लेक पॅनल्स आणि मुलांच्या आवडत्या परिकथांशी संबंधित अनेक गोष्टी येथे असतील. या निमित्ताने सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल ‘शॉप अँड विन’ उपक्रमांतर्गत नेहमीच्या खरेदीदारांना अनेक बक्षीसे देण्याबरोबरच छोट्या दोस्तांनाही खास खेळणी आणि पुढील  भेटवस्तू देणार आहेत.

  • ५ शॉपिंग बॅग्स सोबत कॅरी करा आणि हॅमलेजकडून १ भेटवस्तू/खेळणे  आणि रु.१,००० मूल्याचे गिफ्ट व्हाउचर जिंका,
  • १० शॉपिंग बॅग्स सोबत कॅरी करा आणि हॅमलेजकडून २ भेटवस्तू/खेळणे  आणि रु.१,००० मूल्याचे गिफ्ट व्हाउचर जिंका,
  • सर्वाधिक खरेदी करणाऱ्या १० शॉपर्स ऑफ द वीक खरेदीदारांना रु.१०,००० मूल्य असलेले गिफ्ट हँपर मिळणार आहे.

seawood
जिथे आवश्यक आहे तिथे आनंदाची वृष्टी करण्यावर सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलचा विश्वास आहे आणि समाजातील प्रत्येक स्तरावरील मूल आनंदी होईल तोच खरा ख्रिसमस असेल. नेक्सस मॉल्सचा ‘काळजी घेण्याचे’ मूल्य जपत  आणि अभ्यागतांमध्ये व मुलांमध्ये ‘देण्याच्या व शेअर करण्याच्या’ वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण आपली खेळणी दान करू शकतात. हि  देणगी म्हणून दिलेली जुनी खेळणी देहरंग गावातील मुलांना भेट म्हणून देण्यात येतील. या मुलांना ख्रिसमसची सजावट व वातावरण अनुभवता यावे, यासाठी मॉलमध्ये निमंत्रित करण्यात येणार आहे.
या खेळकर ख्रिसमसबद्दल प्रतिक्रिया देताना सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलचे केंद्र संचालक राहिल नासिर अज्जानी म्हणाले, “सणासुदीची ही परंपरा जिवंत ठेवणे आताच्या काळात काकणभर अधिक महत्त्वाचे आहे. यंदाच्या ख्रिसमसमध्ये आम्हाला आमच्या नेहमीच्या खरेदीदारांना आनंद द्यायचा आहे त्याचबरोबर तत्काळ समाधान आणि सर्वोत्तम खेळण्यांच्या भेटवस्तूंनी  आम्ही बच्चेकंपनीलाही खुश करू इच्छितो. खरेदीची रक्कम जेवढी जास्त असेल, त्यांच्या मुलांना तेवढ्या जास्त भेटवस्तू मिळतील. शहरातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री पाहून मुलांना आणि इतरांनाही खूप आनंद होईल आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम ख्रिसमस वातावरण अनुभवता येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here