‘अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून काही सवलती देत आहोत’

business, corona, uddhav taackery

मुंबई :
सध्या राज्याचे अर्थकारण हे कोरोनाच्या चिखलात रुतले आहे. अर्थचक्र ठप्प झाले आहे. नाहीतर उद्या कोरोनातून बाहेर पडू आणि अर्थचक्रात अडकू. म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे होईल. त्यामुळे माफक स्वरुपात काही ठिकाणी सूट देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आम्ही उद्योगधंद्यांना परवानगी देत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी जाहीर केले.
अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून काही सवलती देत आहोत, असे सांगताना त्यांनी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करु असे ते म्हणाले.  मालवाहतूक सुरु राहिल. मात्र जिल्ह्याच्या सीमा बंदच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया करुन उद्यापासून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरु करु असे ते म्हणाले.
Uddhav Thackeray
https://thebusinesstimes.in/corona-will-destroy-nri-layman-laborers/

यावेळी त्यांनी वृत्तपत्र वितरणावरही भाष्य केले. रेड झोनमध्ये घरोघरी वृत्तपत्र टाकू दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मुंबई, पुण्यात वृत्तपत्राचं वितरण योग्य नाही. यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल. पण घरोघरी वृत्तपत्र देण्यास सध्या बंदी असेल.यावेळी त्यांनी परप्रांतीय मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरु असून लवकरच यावर तोडगा निघेल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. राज्यातील प्रत्येक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचे आपले वचन असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here