युनियन बँक सुरु करणार नवीन १२५ कार्यालये

मुंबई :
युनियन बँक ऑफ इंडियाने देशभरात १२५ प्रादेशिक कार्यालये सुरु करण्याची घोषणा केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण राय जी म्हणाले, “याद्वारे आम्ही एकत्रिकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. संस्थात्मक दृष्टीकोनातून सर्व ३ बँका आता जवळजवळ पूर्णपणे एकिकृत झाल्या आहेत.”
१ एप्रिल २०२० रोजी आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकत्रिकरण झाले. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाने संपूर्ण देशभरात ९५००+ शाखा आणि १३,५००+ एटीएमचे नेटवर्क विस्तारले. एकत्रिकरणानंतर युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक तसेच देशातील प्रत्येक राज्यात शाखा आसलेल्या चौथ्या क्रमांकाचे बँकिंग नेटवर्क आहे. एकत्रित संस्थांचे मध्यवर्ती कार्यालय (सीओ) हे त्याच्या पूर्वीच्याच मुंबईतील नरीमन पॉइंट येथील मुख्यालयात असेल. या मध्यवर्ती कार्यालयाला १८ विभागीय आणि १२५ प्रादेशिक कार्यालये सहाय्य करतील.
शेतीमाल सेवेसाठी ‘समारू’चा पुढाकार

१२५ पैकी ३३ प्रादेशिक कार्यालये अमृतसर, आनंद, भागलपूर, अनंतपूर, राजामुंद्री, सिमला, अमरावती इत्यादी संपूर्णपणे नवीन ठिकाणी आहेत. नव्या कार्यलयांकडून तेलंगना, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या पारंपरिक राज्यांतील बँकेचे कमांडींग मार्केट शेअर अधिक मजबूत करण्याची अपेक्षा आहे. एवढेच नव्हे तर गुवाहटी , सिलिगुडी, दुर्गपूर इत्यादीसारख्या प्रादेशिक कार्यालयांच्या अस्तित्वाद्वारे विशेषत: ईशान्य भारतासह संपूर्ण देशात आपले अस्तित्व विस्तारण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here