युनियन बँक ऑफ इंडियाची व्याजदर कपात

मुंबई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियानेही रेपो आधारित कर्ज दरामध्ये कपात केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर)मध्ये ४० बेस पॉईंट म्हणजेच ०.४० टक्क्यांची कपात केली असून नवीन दर ६.८० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नवीन दर सोमवार १ जून २०२० पासून अंमलात येणार असल्याची माहिती बँकेने दिली. विविध योजनांचे प्रभावी दर उत्पादनाच्या ईबीएलआर अधिक प्रीमियम सवलतीत असतील.
अंकुर जैन ‘भारतपे’चे नवे सीएफओ 

आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ आणि सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना असलेल्या नव्या दराच्या कर्जासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ईबीएलआर आधारित व्याज दर ऑफर करते. अशा प्रकारे १ ऑक्टोबर २०१९ पासून या क्षेत्रांना लागू झालेले सर्व फ्लोटिंग रेट लोन्स हे आरबीआय पॉलिसी रेटशी जोडलेली आहेत. १ एप्रिल २०२० पासून मध्यम उद्योगांना आरबीआयच्या पॉलिसी रेटशीदेखील जोडले गेले आहे.

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here