युनियन बँकेची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

मुंबई :
‘कोरोना’विरुद्ध लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया (मुंबई)च्या कर्मचारी सदस्यांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’साठी ३० लाख रुपयांचे योगदान दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक एम. व्यंकटेश यांनी मंत्रालयात मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव मिश्रा, मुंबईचे उप महाव्यवस्थापक अशोक दास उपस्थित होते. ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत यात शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य म्हणून हा पुढाकार घेण्यात आला.
तांबा आणि बेस मेटलच्या किमतीत वाढ

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here