आता घ्या ऑनलाईन पदवी शिक्षण

मुंबई :
भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन उच्च शिक्षण कंपनी अपग्रेड पहिल्यांदा पदवी शिक्षण क्षेत्रात उतरत असून नामांकित जामिया हमदर्दसोबत अपग्रेड बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) आणि बीसीए (बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन) हे दोन अभ्यासक्रम ऑनलाईन-ऑफलाईन यांचा मेळ असलेल्या पद्धतीने उपलब्ध करवून दिले जात आहेत.  त्यानंतरचे एमबीए आणि एमसीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात आले आहेत.  सरकारमार्फत अनुदानित विद्यापीठ जामिया हमदर्द हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गेल्या आठवड्यात प्रकाशित केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कनुसार भारतातील आघाडीच्या २५ विद्यापीठांपैकी एक आहे आणि या विद्यापीठाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ‘इन्स्टिट्यूशन ऑफ एमीनेन्स’ दर्जा देण्यासाठी लेटर ऑफ इन्टेन्ट देखील देण्यात आले आहे.
ऑफलाईन बेसकॅम्प्स आणि लाईव्ह क्लासेस सहित ऑनलाईन पद्धतीने पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करवून देणारी भारतातील एकमेव एडटेक कंपनी असलेल्या अपग्रेडने ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीसोबत भागीदारी केल्याचीही घोषणा केली आहे.  या भागीदारीमार्फत कॉर्पोरेट आणि फायनान्शियल लॉ विषयात १ वर्षाचे एलएलएम आणि दोन वर्षाचा डिजिटल फायनान्स आणि बँकिंगमधील एमबीए अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.  क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ नुसार जेजीयू हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे खाजगी विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आयओई दर्जा देण्यात आलेला आहे.
व्हर्चुअल शिक्षणाकरिता होतोय ‘या’ प्लॅटफॉर्म वापर

अपग्रेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि सह-संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी ही घोषणा करताना सांगितले, “सध्या संपूर्ण जगात उद्भवलेल्या संकटकाळात नियमितपणे विकास करत राहणे गरजेचे आहे, खासकरून ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव आणि पोहोच वाढवण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. अपग्रेडमध्ये आम्ही बदलत्या परिस्थितीसोबत सदैव विकसित होण्याची आणि अधिकाधिक चांगल्या शिक्षण सुविधा तयार करण्याची ग्वाही देतो. आमचा पदवी पोर्टफोलिओ विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी सक्षम करतो, यामध्ये त्यांना ऑफलाईन शिक्षण प्रणालीवर उद्भवलेल्या संकटाबाबत विचार करण्याची अजिबात गरज उरत नाही.”  
उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये २०२२ पर्यंत ४१ मिलियन विद्यार्थी दाखल होतील असे अनुमान आहे, या क्षेत्रामध्ये अपग्रेडने आपल्या नवीन उद्योगासाठी १५० कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे.
गुंतवणूक आणि उद्योगजगताच्या अधिक महितासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here