मुंबई :
कोरोनाचा होणार प्रसार रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि मास्क वापरणे हि आता दैनंदिन व्यवहाराचा भाग झाली आहे. याचाच प्रसार करण्यासाठी आता ‘पीटर इंग्लंड’ आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या विडिओ च्या माध्यमातून आयुषमान ने साथीचा प्रसार होऊ नये म्हणून फेस मास्क घालण्याचे महत्व आणि त्याची आवश्यकता स्पष्ट केली आहे. आयुषमानचा चाहता वर्ग सर्व वयोगटात असून अतिशय प्रतिभावान आणि यशस्वी अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे.
आपल्या या उपक्रमाबद्दल बोलताना, आयुषमान खुरानाने सांगितले कि, कोरोना व्हायरस साथीच्यावेळी मी आरोग्य आणि सुरक्षा उपयांव्यतिरिक्त हरेक पद्धतीने जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी पीटर इंग्लडसोबत अशा उपक्रमात जोडून घेताना मला विशेष आनंद होत आहे. या महामारीमध्ये मास्क परिधान करणे सर्वात जास्त महत्वाचे आहे आणि म्हणूनच जागरूकता वाढविणे हे एक योग्य दिशेने पाऊल आहे, जे आपल्या आरोग्याबद्दल आपण जागरुक कसे राहावे हे दाखवते आणि त्याचबरोबर, आपण मोठ्या प्रमाणात समुदायाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काळजी घेतली पाहीजे.
’अशा’ प्रकारे सुरु करा ऑफिसचा कॅफेटेरिया
या उपक्रमाबद्दल पीटर इंग्लंडचे सीओओ मनीष सिंघई म्हणाले की, “अलीकडेच झालेल्या अभ्यास परिणामात, कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी रोजच्या रूटीनचा भाग म्हणून फेस मास्क घालणे आता आवश्यक झाले आहे. म्हणूनच, आमच्या क्षमतेचा आणि कौशल्याचा फायदा घेत आम्ही उच्च प्रतीच्या कपड्यांचे मास्क तयार करण्याचे काम सुरू केले आहे, जी काळाची गरज आहे. आयुष्यमान एक स्टाईल आणि युथ आयकॉन म्हणून लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि आमचा विश्वास आहे की त्यांची लोकप्रियता आम्हाला हा सामाजिक संदेश देशभरातील भारतीयांपर्यंत मोठ्या संख्येने पोहोचविण्यात मदत करेल. ”
दरम्यान, मेन्सवेअर क्षेत्रातील ब्रँडच्या वाढीस अधिक गती देण्यासाठी पीटर इंग्लंडने आयुष्मान खुराना यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदी घोषणा केली आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…