मुंबई :
कोरोनामुळे देशाची स्थिती चहुबाजूने नाजूक होत असल्यामुळे विविध सामाजिक संस्था आणि कंपन्यांच्यावतीने सरकारला हि परिस्थिती सुधारण्यासाठी सहकार्य केले जात आहे. विविध व्यावसायिकांनी आपापल्यापरीने केंद्र आणि राज्य सरकारला मोठ्याप्रमाणात आर्थिक सहकार्य केले असून अनेकजण त्यापुढे जात गरजूना विविध प्रकारे मदत करत आहेत. विक्रम सोलर (vikram solar) देखील या काळात सुमारे एक लाख गरिबांना दोन वेळेचे भोजन देत आहे.
अक्षय पात्र फाऊंडेशन या सामाजिक संस्थेसोबत विक्रम सोलर (vikram solar)ने एकत्र येत, कोरोनामुळे देशभरात स्थानबद्ध झालेल्या एक लाख गोरगरिबांना दोनवेळेचे पुरेसे जेवण देत आहे. देशभरातील बेघर, वृद्ध आणि मुले, रोजंदारी कामगार, स्थलांतर करणारे कामगार, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक, दिव्यांग, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना हे अन्न घरपोच देण्यात येत आहे. देशातील विविध शहरांत ५४ ठिकाणी हे मदत कार्य सुरु असल्याचे विक्रम सोलर (vikram solar)च्यावतीने सांगण्यात आले.
काय करणार जिओ, फेसबुकच्या गुंतवणूकीचे?
कंपनीच्यावतीने फालटा, पश्चिम बंगाल येथे त्यांच्या कारखान्याजवळील भागात रेशन उत्पादनांचे सुद्धा वितरण करीत आहेत. यासोबत राजस्थानमधील त्यांच्या प्लांट जवळील बर्याच स्थानिक समुदायांना अन्नधान्य आणि किराणा सामान देऊन त्यांना आधार देत असल्याचे विक्रम सोलरचे व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश चौधरी यांनी सांगितले. आपल्या देशातील सर्वसामान्यांसाठीचे हे आमचे सहकार्य अगदीच थोडे असल्याची जाणीव आम्हाला नक्कीच आहे. पण ते या अशा अडचणीच्या वेळी नक्कीच केले पाहिजे. सगळे एकत्र आलो तर आपण या जागतिक महामारीवर निश्चितच मात करू असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
…आणि आता ‘फॉर मोअर शॉट्स प्लीज!’चा सांगीतिक अवतार