सीएएमएसचा आयपीओ 21 सप्टेंबर रोजी खुला

CAMS

​मुंबई :
चेन्नईस्थित कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्विसेस (सीएएमएस) आपले सुरुवातीचे समभाग 21 सप्टेंबर 2020 रोजी खुले करत आहे. 1229-1230  रु. दर समभागासाठी प्राइज बँड असलेल्या या समभागांची विक्री 23 सप्टेंबर रोजी बंद होईल.अँ कर इन्व्हेस्टर्सतर्फे नोंदणी आणि त्यांना केले जाणारे वाटप 18 2020 रोजी म्हणजे बिड/ऑफरपासून कामाच्या एक दिवस आधी पूर्ण व्हायला हवे.
ही ऑफर समाभागांच्या विक्रीची ऑफर असल्याने सीएएमएस या ऑफरमधून कोणताही निधी मिळवणार नाही.​ ​सुरुवातीची सार्वजनिक विक्री कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेडच्या 10 रु. दर्शन मुल्या​​च्या (समभाग) 18246600 समभागांची असेल. या ऑफरमध्ये १८२५०० समभाग (ऑफरनंतरच्या पेड-अप समभागांमधील 0.37% वाटा) पात्र कर्मचाऱ्यांच्या विक्रीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. एम्पलॉई रिझर्व्हेशन पोर्शनव्यतिरिक्तच्या ऑफरला इथून पुढे ‘नेट ऑफर’ संबोधले जाईल. ऑफर आणि नेट ऑफरचा आमच्या पोस्ट-ऑफर पेड-अप समभाग निधीमधील वाटा अनुक्रमे  किमान 37.40 आणि 37.03 टक्के इतका आहे. सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (नियमन) नियम, नियम 31 सह 1957मधील नियम क्रमांक 19(2)(बी) मधील बदलांनुसार, सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अॅण्ड डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, 2018 (“सेबी आयसीडीबी रेग्युलेशन्स”),च्या माध्यमातून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत हा प्रस्ताव ठेवला जात आहे. या नियमांमध्ये झालेल्या सुधारणेनुसार (सेबी आयसीडीआर नियम) निव्वळ ऑफरच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (क्यूआयबी) प्रमाणबद्ध वाटप करताना (क्यूआयबी पोर्शन) उपलब्ध नसावेत, विना संस्थांत्मक बोली लावणाऱ्यांसाठी (नॉन इन्स्टिट्यूशनल बिडर्स) ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी वाटा असू नये. तसेच, किरकोळ वैयक्तिक (रीटेल इंडिव्हिज्युअल) बिडर्ससाठी 35 टक्क्यांपेक्षा कमी वाटा असू नये.
मागणी घसरली, तेल पसरले… 
CAMS
कंपनीकडे ग्रेट टेरेने (वारबग पिनॅकसची उपकंपनी), एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिडेड आणि एनएसई इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांची महत्त्वाची गुंतवणूक आहे.कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिडेट, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शिअल अॅडव्हायझररी अॅण्ड सेक्युरिटीज या प्रस्तावासाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) म्हणून काम पाहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here