‘हेलिकॉप्टर मनी’ म्हणजे काय ?

helicopter money

सध्या ‘हेलिकॉप्टर मनी’ हा शब्द आणि मुद्दा दोन्ही चर्चेत आला आहे. मुळात हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय आणि त्याचे अर्थ आणि संकल्पना आपण या समजून घेऊया.
हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना सगळ्यात आधी अमेरिकन अर्थतज्ञ ‘मिल्टन फ्राईडमन’ यांनी मांडली. या संकल्पनेचा शब्दशः अर्थ ‘हेलिकॉप्टरने आकाशातून खाली फेकलेले पैसे’ असा होतो. अर्थशास्त्रात ‘हेलिकॉप्टर मनी’ म्हणजे पडत चालेल्या अर्थव्यवस्थेत उभारी यावी म्हणून एकदम टाकलेले पैसे होय. यात मोठ्या प्रमाणात चलनांची छपाई आणि थेट जनतेमध्ये वितरण असे मुद्दे समाविष्ट आहेत.
Milton-Friedman, helicopter money
थोडक्यात अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणात केली गेलेली गुंतवणूक म्हणजे हेलिकॉप्टर मनी होय. सध्या कोरोना आणि इतर अनेक कारणामुळे दिवसागणिक पडत चाललेल्या अर्थाव्यवस्थेबाबत बोलताना तेलंगानाचे अर्थमंत्री के. सी. राव यांनी हेलिकॉप्टर मनी हा शब्दप्रयोग करून ही संकल्पना चर्चेत आणली. त्यांनी Quantitative Easing policy वापरून RBI ने एकूण GDP च्या 5% गुंतवून करावी अशी मागणी ही केली.
Quantitative Eeasing आणि हेलिकॉप्टर मनी यां दोन्ही संकल्पना चलन छपाईशी निगडीत असल्या तरी त्यांच्यामध्ये बरेच फरक आहेत. Quantitative Easing विशेषतः सरकारी bonds खरेदी करण्यासाठी तयार केली जाते. हेलिकॉप्टर मनी पॉलिसी विशिष्ट काळातच वापराण्यासाठीची तरतूद आहे.
जापान मध्ये अशा प्रकारचा प्रयोग सरकार मोठ्या प्रमाणात करत असल्याचे काही जाणकार सांगतात. परंतु जपान आणि भारताची तुलना करून ही पॉलिसी योग्य का अयोग्य हे ठरवणे निश्चितच शक्य नाही. जपान सरकार जरी हा प्रयोग करत असलं तरीही त्याच्या परिणामांविषयी सध्यातरी स्पष्ट असे काहीही आढळत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here