काय करणार जिओ, फेसबुकच्या गुंतवणूकीचे?

facebook, jio

जिओमध्ये (JIO) फेसबुक गुंतवणूक करणार, या गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला बुधवारी सकाळी पूर्णविराम मिळाला. कारण फेसबुकच्यावतीने अधिकृतपणे याबाबतची घोषणा करत, जिओमध्ये (JIO) 4.62 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहिर करण्यात आली. या बातमीमुळे देशातील फेसबुक आणि जिओ (JIO) ग्राहकांसोबतच शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. त्याचवेळी सर्वसामान्यांना प्रश्न पडला की फेसबुकने गुंतवलेल्या या पैशांचे जिओ नेमके करणार तरी काय? याच प्रश्नाचा घेतलेला हा वेध, त्यातून समोर आलेले काही मुद्दे बिझनेस टाइम्सच्या वाचकांसाठी
.
फेसबुकची जिओत 43574 कोटींची गुंतवणूक

हा गुंतवणूक करार 4.62 लाख कोटी रुपये म्हणजेच 65.95 बिलियन डॉलरचा आहे. ज्यात एका युएस डॉलरची किंमत 70 रुपये धरली आहे.

या करारानुसार जिओचे 9.99 टक्के समभाग (शेअर) हे फेसबुककडे जाणार आहेत.

फेसबुककडून येणारे 4.62 लाख कोटी रुपये जिओच्यावतीने त्यांच्या महत्वाकांक्षी रिलायन्स जिओ (JIO) मार्टमध्ये प्रामुख्याने गुंतवण्यात येणार आहे. यानुसार जिओची जिओ मार्ट आणि फेसबुकचे व्हॉटस्अ‍ॅप एकत्र येणार असून, ग्राहकांना जिओ मार्टवरील खरेदी व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून करता येणार आहे.

फेसबुकचे मुख्य महसूल अधिकारी डेव्हिड फिशर आणि फेसबुकचे उपाध्यक्ष आणि भारताचे व्यवस्थापकिय संचालय अजित मोहन यांनी सांगितले की, फेसबुकच्या या गुंतवणूकीमुळे जिओ मार्ट आणि व्हॉटस्अ‍ॅप एकत्र आल्यामुळे सुमारे 400 दशलक्ष ग्राहकांना एकत्र सेवा देता येणार आहे. घरबसल्या भाजी मागवण्यापासून ते उद्योग करण्यापर्यंत विविध बाबी फक्त मोबाईल फोनच्या सहाय्याने भारतीय करू शकतील.
jio, facebook
Investment करा प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने…

या करारामुळे फेसबुकला भारतामध्ये आपला विस्तार वाढवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 560 दशलक्ष लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचले आहे, त्यामध्ये जिओचे सुमारे 388 दशलक्ष, म्हणजेच निम्म्याहून अधिक ग्राहक आहेत.

फेसबुकच्या या गुंतवणूकीचा फायदा करून घेत जिओ आपल्यावरील कर्ज कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. गेल्या काही वर्षांपासून रिलायन्स इंड्रस्टीज् लिमिटेड अशाच एका धोरणी आणि महत्वाकांक्षी सहकार्‍याच्या शोधात होती. ज्यामुळे त्यांचा विस्तारही वाढेल आणि कर्जाचा बोजाही कमी करता येईल. मार्च 2021 पर्यंत रिलायन्स आपल्यावरील सगळे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करणार आहे. फेसबुकमुळे त्यांना ही संधी मिळाली आहे, असे नक्कीच म्हणता येईल.

फेसबुककडे 400 दशलक्षहून अधिक भारतीय व्हॉटस्अ‍ॅपचे वापरकर्ते आहेत. हा आकडा अर्थातच प्रचंड मोठा आहे. त्यामुळे याचा वापर करत फेसबुक भारतामध्ये ‘पेमेंट अ‍ॅप’ची घोषणा करण्याची शक्यता आहे. जिओतील त्यांच्या गुंतवणूकीमुळे फेसबुकला यासगळ्यासाठी स्थानिक सहकारी लाभला आहे.
जिओ आणि फेसबुकच्या एकत्र येण्यामुळे ‘डिजिटल इंडिया’ला मोठ्या प्रमाणात सहकार्य होईल, असे म्हटले जात आहे.
jio, facebook

jioतील ही एकमेव गुंतवणूक नाही…  :

या गुंतवणूकीच्यावेळी फेसबुक सीईओ मार्क झकेरबर्गने म्हटले आहे, मला विश्वास आहे की कोरोनानंतर भारताची अर्थव्यवस्था ही अत्यंत वेगाने सुधारेल आणि देशाचा गाडा लवकरच रुळावर येईल.

भारत हे फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या फेसबुकच्या तिन्ही सोशल नेटवर्क साइटचे माहेरघर मानले जाते. अन्य कोणत्याही देशांपेक्षा भारतामध्ये या तिन्ही सोशल साईटस्चे ग्राहक हे प्रचंड आहेत. त्यामुळे भारतामध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करणे हे कधीही फेसबुकच्या पथ्यावरच पडणारी बाब आहे.

या गुंतवणूकीमुळे फेसबुकला अधिकाधिक भारतीयांपर्यंत पोहोचता येणार आहे. त्याचप्रमाणे भारतातील औद्योगिक बुध्दीमत्ता आणि संधीला विशेष वाव करून देण्यासाठीही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले. भारतीय उद्योजकांना फेसबुकचे विविध प्लॅटफॉर्म आणि जिओचे नेटवर्क वापरून आपला उद्योग अधिक वाढवता येणे अधिक सोपे होणार आहे.

जिओमध्ये केलेली गुंतवणूक ही काही फेसबुकची भारतातील पहिलीवहिली गुंतवणूक नाही. यापूर्वी मिशो या सोशल कॉमर्स कंपनीमध्ये तसेच युएनअ‍ॅकडमी या ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअपमध्येही फेसबुकने गुंतवणूक केली आहे.
jio, facebook
गोष्ट राणीच्या राज्याची… एलिझाबेथ : द व्हर्जीन क्वीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here