‘व्हिसलिंग वूड्स’च्या परीक्षा २५ पासून

subhash ghai

मुंबई :
व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय), ही आशियातील प्रमुख फिल्म, कम्युनिकेशन आणि क्रिएटीव्ह आर्ट्स इन्स्टीट्युट असून त्यांच्या २०२० प्रवेशाकरिता असलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांच्या तिसऱ्या फेरीची घोषणा करण्यात आली. डब्ल्यूडब्ल्यूआय’च्या पूर्णवेळ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास कार्यक्रमांच्या प्रवेश परीक्षांची नोंदणी अनुक्रमे २२, २३ आणि २६ मे दरम्यान बंद होणार आहे.
‘लिबर्टी’ने साजरा केला वर्चुअल वर्धापन दिन

डब्ल्यूडब्ल्यूआयच्या वतीने देऊ करण्यात येणारे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास कार्यक्रम हे आशियाची सर्वात जुनी व्यावसायिक सामाजिक कार्य शिक्षण संस्था टाटा इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्सेस द्वारा अधिस्वीकृत केलेले आहेत. प्रवेश परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून आरोग्याच्या दृष्टीने उद्भवलेल्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर अजर्दारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. या नोंदणीनंतर ऑनलाईन प्रवेश परीक्षा २५, २६ आणि २९ मे, २०२० दरम्यान घेण्यात येतील.
या संस्थेला फोर्ब्स इंडियाच्या वतीने ‘इन्फ्लूऐंशियल इन्स्टीट्युट ऑफ इंडिया’ (भारताची प्रभावी संस्था) म्हणून गौरवण्यात आले असून या संस्थेचे २२००+ विद्यार्थी भारत तसेच जगभरातील विविध मीडिया संघटना, फिल्म निर्मिती कंपन्या आणि फॅशन उद्योगांसमवेत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here