एफएसएआयची धुरा महिलेच्या हाती

FSAI

पणजी:
फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (गोवा विभाग) यांच्या नवीन कार्यलयाचे नुकतेच ऑनलाईन सोहळ्याच्या माध्यमातून नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांची नेमणूक केली. या सोहळ्याला मुख्य पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते अग्निशमन आणि आपत्कालीन सेवाचे संचालक अशोक मेनन आणि विशेष अतिथी महिला व बाल विकास संचालक, दीपाली नाईक,एफएसएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश मेनन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी राष्ट्रीय सचिव राखी दीपक, अध्यक्षीय सदस्य वेंकटेशू सी आणि प्रमोद राव आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पंकज धारकर उपस्थित होते.
एफएसएआयची (गोवा विभाग) उद्दिष्टे ध्यानात घेत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जेनिफर लुईस कामत यांची नियुक्ती केली तर सचिव म्हणून विनोद रॉड्रिग्ज आणि सहसचिव श्री शॉन डिसा यांची निवड करण्यात आली. यावेळी निर्वाचित करण्यात आलेल्या सहसचिव म्हणून शॉन डीसा, अरमान बंकले, वसंत आगशीकर, शैलेश मजुमदार, शशांक केणी, गणेश हेगडे, अशोक जोशी, रवी दीक्षित, रसेल फलेरो, आनंद रामकृष्णन, अवनीश द्विवेदी, तत्काळ माजी अध्यक्ष कुलशेखर कांतीपुडी व सचिव प्रेम नादर यांच्या समवेत प्रथम अध्यक्ष राजकुमार कामत आणि सचिव अजित कामत यांचीही नियुक्ती करण्यात आली.

कल्याणकरांसाठी आता ‘हॅप्पीनेस्ट’ अनुभव
FSAI
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विभागाच्या नवनिर्वाचित सदस्य डॉ जेनिफर लुईस कामत आणि इतर कार्यकारी सदस्यांचे अभिनंदन केले आणि उत्कृष्ट ज्ञान, उत्कटतेने काम करणाऱ्या महिला सक्षम नेतृत्वामुळे अग्नि / जीवन सुरक्षा आणि सुरक्षा विकासाच्या बाबतीत चांगला परिणाम पहायला मिळतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. एफएसएआयच्या सुरक्षित भारत या मोहिमेबद्दल यावेळी बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला. या पैलूमध्ये संघटना कौशल्य, विकास, कार्यक्षमता आणि व्यावसायिकत्याच्या वाढीच्या दृष्टिकोनातून “आत्मनिर्भर (स्वयंपूर्ण) च्या पूर्तीसाठी आणखी एक पूरकअग्निसुरक्षा / सुरक्षा विभागात आणखी एक उत्कृष्ट प्रयत्न केला जात आहे.
यावेळी बोलताना त्यांनी राज्यव्यापी संयुक्त कार्यक्रमावरही भाष्य केले आणि या काळात सायबर सिक्युरिटीने वारंवार ऑनलाईन माध्यमांचा वापर केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. भारताला आणि गोव्याला एफएसएआय यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्य सरकारनेहमीच त्यांच्यासोबत असेल असेही ते यावेळी म्हणाले. तसेच यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जेनिफर लुईस कामत यांनी सांगितले की, सुरक्षित गोव्यासाठी नागरिकांना सुरक्षा आणि सुरक्षेबाबतची जागरूकता देण्यासाठी त्या परिश्रम घेतील. सायबर क्राईम अँड सिक्युरिटी मधील शैक्षणिक आणि जनजागृती उपक्रम नागरिकांसाठी आयोजित केला जाईल व त्याबरोबरच अग्निशमन करताना आणि नंतर संरचनेची व साहित्याची सुरक्षा आणि वर्तन, शाळा व संस्था, हॉटेल, यामधील कार्यक्रम या विषयावर शैक्षणिक व जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशा त्यांच्या कल्पना आहेत. तसेच रुग्णालये, फार्मास्युटिकल कंपन्या आणि इतर उत्पादन युनिट्स तसेच महिला सुरक्षा कार्यक्रमही आयोजित करण्यावर त्यांचा भर असेल.
विशेष अतिथी म्हणून आलेल्या महिला व बालविकास संचालक दिपाली नाईक यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सुरक्षिततेवर आणि मुलांसाठी अग्निसुरक्षा व सुरक्षा विषयक जागरूकता यावर भर दिला. प्रमुख पाहुणे व वक्ते अशोक मेनन यांनी नमूद केले की सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, प्रोफेशनल बॉडी ऑफ फायर प्रोफेशन्स, सुरक्षा तज्ञ आणि औद्योगिक तज्ञ देशाच्या अर्थव्यवस्थेत या सेवांच्या आवश्यकतेबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण करण्यास सक्षम आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here