जग महामंदीच्या उंबरठ्यावर…: ख्रिस्टिलिना जार्वीवा

kristalina-georgieva

नवी दिल्ली :
कोरोनामुळे जगाला ग्रासले असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी जगाला १९३० मधील महामंदीनंतरच्या सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागेल अशी शक्यता वर्तवली आहे. २०२० मध्ये जागतिक विकास  वेगाने नकारात्मक होईल आणि १७० हून अधिक देशातील व्यक्तींची उत्पन्न वाढ त्याच दिशेने मार्गक्रमण करेल, असेही त्यांनी म्हटले.
त्या पुढे म्हणाल्या की, आपल्याला या मोठ्या मंदीनंतर सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागू शकतो. ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, कोरोना विषाणूमुळे जगातील अर्थव्यवस्थेत १९३० च्या महामंदीनंतरची सर्वांत मोठी घसरण दिसू शकते. जग या संकटाच्या कालावधीवरुन अनिश्चित आहे. पण हे आधीच स्पष्ट झाले आहे की, २०२० मध्ये जागतिक वृद्धी दरांत मोठी घसरण होईल. त्या पुढे म्हणाल्या की, आमच्या १६० सदस्य देशातील प्रति व्यक्तीचे उत्पन्न वाढेल, असा आमचा तीन महिन्यापूर्वी अंदाज होता. आता सर्वकाही बदलले आहे. आता १७० हून अधिक देशातील प्रति व्यक्तीचे उत्पन्न घटण्याचा अंदाज आहे. या आर्थिक संकटामुळे कमकुवत देशांना सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उभरत्या बाजारपेठा आणि कमी उत्पन्न असलेले आफ्रिकन, लॅटिन अमेरिका आशियातील बहुतांश क्षेत्रात अधिक जोखीम आहे. 

​१​९३० मधील जागतिक महामंदीतील अमेरिकेतील एक दृश्य. ​

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here