झीने आणला ‘हिपि प्लॅटफॉर्म’

HIPI

मुंबई :
झी५ चा हा बहुप्रतीक्षित प्रकल्प ‘हिपि-द शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म’ (HIPI) बीटा रोलसह लाँच केला त्याद्वारे अब्जावधी भारतीयांना केवळ एका चाहत्यापासून स्वतःचा चाहतेवर्ग तयार करण्याचा प्रवास पूर्ण करता येणार आहे. आत्मनिर्भर भारतच्या या जगात या प्लॅटफॉर्मवर युजर्सना ब्रँड सुरक्षित, अतिशय सर्जनशील आणि आनंदी वातावरणात मजा करता येईल. हिपि हा कंटेट ग्राहकांपासून कंटेंट क्रिएटर्सपर्यंत प्रत्येकासाठी सुयोग्य प्लॅटफॉर्म आहे.
या प्रसंगी झी५ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण कटियाल म्हणाले, ‘हिपिचे लाँच आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मची निर्मिती आत्मनिर्भर भारत धोरणाला सुसंगत म्हणजेच भारतात करण्यात आली आहे. हिपि तुमच्या मनोरंजन करण्याच्या अनुभवात क्रांती घडवून आणणार आहे, कारण त्याद्वारे आपल्यातील गुणवत्ता सर्वांसमोर आणण्यासाठी जागतिक पातळीवर उपलब्ध असणारा प्लॅटफॉर्म खुला करून दिला जाणार आहे. हा प्लॅटफॉर्म आपल्याला ‘फॅनडम’ पर्यंत घेऊन जाईल. हिपि भारतीयांना त्यांच्या लाखो चाहत्यांशी कनेक्ट करण्याची संधी देणारा आहे. हा प्लॅटफॉर्म मनोरंजन करणाऱ्यांचे अधिकृत घर असेल. हिपि झी५ ला भारताचे मनोरंजन सुपर-अप होण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे घेऊन जाईल.’
सखोल संशोधनानंतर वैविध्यपूर्ण भारतीय प्रेक्षकवर्गासाठी या प्लॅटफॉर्मची संकल्पना व निर्मिती करण्यात आली आहे. विविध वैशिष्ट्यांचा समावेश असलेले हे प्लॅटफॉर्म युजर्सना वेगवेगळ्या फिल्टर्स आणि इफेक्ट्सह आपली गुणवत्ता सादर करण्याची तसेच इतरांनी तयार केलेला कंटेट शोधण्याची, फॉलो करण्याची व त्याची प्रशंसा करण्याची संधी दिली जाईल. हिपिच्या इंटरफेजसह तयार करण्यात आलेला हा अनोखा फॉरमॅट आणि तंत्रज्ञान युजर्सना ९० सेकंदांपर्यंतचे व्हिडिओज तयार करण्याची संधी देतो. आज अँड्रॉइंडसाठीची बिटा आवृत्ती लाँच केले जात असून पूर्ण प्रदर्शन टप्प्याटप्प्याने केले जाईल, तर पुढील काही आठवड्यांत आयओएस आवृत्ती लाँच केली जाईल. जिथे भारतीयांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची आणि जागतिक सर्जनशील पातळीवर आपली दखल घेतली जावी यासाठी संधी मिळेल.

बक्कळ निधीचा मित्रोंला हात
HIPI
झी५ इंडियाच्या विस्तार प्रकल्प विभागाचे व्यवसाय प्रमुख आणि उत्पादन प्रमुख रजनील कुमार म्हणाले, ‘नव्या आणि दमदार भारतासाठी झी५ चा वन- स्टॉप डेस्टिनेशन म्हणून विकास करण्याच्या संकल्पनेतून हिपिचे धोरण तयार झाले. हा प्लॅटफॉर्म अतिशय काळजीपूर्वक बनवण्यात आला आहे, कारण त्याद्वारे क्रिएटर्स, युजर्स, ब्रँड्स आणि प्रेक्षक या सर्वांसाठी सर्जनशील वातावरण पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मची एकंदर फ्रेमवर्क सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी व त्याचबरोबर आमच्या युजर्सची सुरक्षा जपली जाईल याची काळजी घेऊन तयार करण्यात आली आहे. हा  प्लॅटफॉर्म  खऱ्या अर्थाने भारतीयांसाठी, भारतात बनवण्यात आला आहे.’ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here