सिंगापूर आले भारतीयांच्या घरी…

मुंबई :
कोव्हिड- 19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेत झोमॅटोबरोबर सिंगापूर टुरिझम बोर्डाच्या  नॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन्सने डिजिटल भागीदारी केली आहे. यामुळे भारतीयांना घरबसल्या सिंगापूरची खाद्य-संस्कृती टूर अनुभवता येणार आहे. झोमलँड@होम या विशेष साप्ताहिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हि टूर अनुभवता येणार आहे. 
भारतातील नऊ शहरांत आयोजित करण्यात आलेल्या झोमलँड सीझन 2 साठी झोमॅटोबरोबर केलेल्या यशस्वी भागिदारीनंतर एसटीबी परत एकदा या प्रसिद्ध रेस्टॉरंट अग्रीग्रेटर आणि फुड डिलीव्हरी प्लॅटफॉर्मच्या साथीने डिजिटल उपक्रम सादर करत आहे. झोमलँड@होम या वीकेंड फेस्टिव्हलमध्ये भारत व सिंगापूरमधील प्रसिद्ध कलाकार त्यांची कला आणि लज्जतदार जेवण, संगीत व स्टँड अप कॉमेडी यांसारखी आपली पॅशन सादर करतील. चाहत्यांना त्यांच्या घरात राहूनच या फेस्टिवलची मजा घेता येणार आहे.

या भागिदारीअंतर्गत रॅपर आणि गायक Yung Raja, शेफ्स Sarah Huang Benjamin आणि Eric Chan, mixologist Vijay Mudaliar, स्टँड अप कलाकार Rishi Budhrani and Sharul Channa, DJ Luq Here तसेच Indian Chef Saransh Goila एसटीबीबरोबर पूर्वी विविध प्रकल्पांवर काम केलेल्या अशा सिंगापूरच्या सात कलाकारांचा समावेश आहे.
प्रेक्षकांना वेगवेगळे कलाकार एकत्र येण्याची जादू अनुभवता येईल. शेफ एरिक्स आणि सारांश एकत्र येऊन चविष्ट खाद्यपदार्थांची त्यांची पॅशन, शेफ म्हणून झालेला प्रवास सादर करतील व इतकंच नाही, तर एकमेकांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवरून प्रेरण घेत खास पदार्थ बनवतील. रॅपर आणि गायक यंग राजा आणि त्यांचे भारतीय साथील नेझी पहिल्यांदाच एकत्र येणार असून चाहत्यांना दमदार रॅप ऐकाला मिळेल.
  
एक्सपे लाइफचा मे महिन्यात विक्रमी व्यवहार

त्याशिवाय शेफ एरिक ‘मॅड अबाउट सुक्रे’ या आपल्या रेस्टॉंरंटची खासियत असलेल्या चीजकेक डेझर्टची पाककृती शेयर करतील, तर शेफ सारा सिंगापूरचे पेरानाकान संस्कृतीची माहिती देतील. नेटिव्ह बारचे प्रसिद्ध मिक्सॉलॉजिस्ट विजय यांच्याकडून डीआयवाय कॉकटेलच्या पाककृती शिकता येतील. रिषी आणि शारूलच्या ‘किचन रोस्ट’ या सेशनमध्ये प्रेक्षकांना भरपूर हसता येईल, कारण यात हे दोन्ही कलाकार जेवण बनवण्याचा प्रयत्न करत आपल्या धमाल विनोदांनी एकमेकांना रोस्ट करतील. पार्टीत रंग भरण्यासाठी लक हिअर (डीजे) लोकप्रिय गाण्यांची मेजवानी देतील.

याबद्दल एसटीबीचे भारत, मध्य पूर्व आणि दक्षिण आशिया (आयएमईएसए) विभागाचे प्रादेशिक संचालक जीबी श्रीथर म्हणाले, ‘सिंगापूरमध्ये परत एकदा पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी अजून वेळ असला, तरी भारतीय ग्राहकांबरोबर असलेले नाते आम्हाला जपायचे आहे. 2019 मध्ये झोमॅटोबरोबर केलेल्या यशस्वी भागिदारीनंतर परत एकदा या व्हर्च्युअल वीकेंड फेस्टिवलच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना सिंगापूरचे खाद्यपदार्थ, नाइटलाइफ आणि मनोरंजनाचे पैलू यांचा अनुभव देण्यासाठी आम्ही या नाविन्यपूर्ण संयुक्त डिजिटल उपक्रमाची सुरुवात करत आहोत.’
झोमॅटो लाइव्हचे जागतिक प्रमुख चैतन्य माथुर म्हणाले, ‘नऊ शहरांत झोमलँडची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर मनोरंजनाच्या डिजिटल क्षेत्रात उतरण्यासाठी झोमॅटोने सुरू केलेल्या झोमलँड@होमद्वारे परत एकदा ही भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. खाद्यपदार्थ, नाइटलाइफ आणि मनोरंजन अशा सर्व क्षेत्रातील भारत व सिंगापूरमधील कलाकार विविध प्लॅटफॉर्म्सवर लाइव्ह सादरीकरण करतील, प्रेक्षकांना अभूतपूर्व अनुभव देतील आणि आपण सर्व जण वेगवेगळ्या देशांत क्वारंटिन असताना पुढचे दोन वीकेंड्स आपले मनोरंजन करतील.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here